माजी कार्यकारणी सदस्य श्री. सुनिल जेठे यांची रोखठोक प्रतिक्रिया...


   क्षा. म. समाज संस्थेच्या भल्यासाठी असणारे लेख `समाज माझा, मी समाजाचा!' ब्लॉगवर...

`क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, परळ, मुंबई' ह्या संस्थेच्या भल्यासाठीच...`समाज माझा, मी समाजाचा!' हा ब्लॉग मी गेली पाच वर्षे लिहितोय! आजपर्यंत तीस लेख झाले. आता समाज बांधव-भगिनी खऱ्या अर्थाने जागृत व्हायला लागले, बिनधास्तपणे व्यक्त व्हायला लागले, लिहू लागले, प्रतिक्रिया देऊ लागले! त्यांनी समाज संस्थेच्या हितासाठी जे काही लिहिलं, ते ह्या ब्लॉगवरती प्रसिद्ध करणं महत्वाचं आहे; कारण `समाज माझा, मी समाजाचा!' ह्या चळवळीला अधिक समर्थ करणारे ते लेख-त्या प्रतिक्रिया आहेत; असं मी मानतो! म्हणूनच मागील काही दिवसात समाजमाध्यमांवरती समाज बांधबांचे प्रसिद्ध झालेले लेख व प्रतिक्रिया देत आहे. 

-नरेंद्र हडकर


माजी कार्यकारणी सदस्य श्री. सुनिल जेठे यांची रोखठोक प्रतिक्रिया...  

१) क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेचे कार्यकारणी सदस्य मागील बावीस दिवस गांधीगिरी मार्गाने आंदोलन करीत असताना क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेचे विश्वस्त अद्याप ह्याची दखल का घेत नाहीत?

२) तटस्थ भूमिका घेण्याची जबाबदारी असताना निवडणूकीत हेच विश्वस्त सत्ताधारी पक्षाचा प्रचार करीत होते आणि निवडणूकीत गैरमार्गाने सत्ताधारी लोकांना पुन्हा निवडून दिले. ह्यांना विश्वस्त का म्हणावे? हे समाज संस्थेच्या हितासाठी नाही तर स्वतःच्या पदासाठी व स्वार्थासाठी पदाचा गैरवापर करीत आहेत. त्याचप्रमाणे ह्यांनीच स्वप्नीकची पाटीलशाही आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. एवढेच नव्हे तर जर संस्थेतील भ्रष्टाचार उघडकीस आल्यास हेच विश्वस्त तुरुंगात जातील. हे त्यांना माहीत आहे म्हणूनच ते सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत. हे सत्य समोर येतं!

३) मागील निवडणुकीत स्वप्निल समर्थकांना उमेदवारी दिली आणि आताच स्वप्निल समर्थकांला विश्वस्त म्हणून घेतले. तर जी समाज संस्थेला गिळंकृत करणारी ‘स्किम' आणली होती त्यातील एकाला सुकाणू समितीत घेतले.

त्याचप्रमाणे समाजाच्या पतपेढीच्या निवडणुकीत ज्याने स्वप्निलच्या पॅनेलने नेतृत्व केले त्याला सुकाणू समितीत घेतले आणि त्यालाच मागाठणे समितीचे अध्यक्षपद बहाल केले. ह्याचा अर्थ काय? हे समाज बांधव भगिनींनी समजून घेतला नाही तर भविष्यात २०१२ पुर्वीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

जे यंत्रणेत पद मिळावे म्हणून सत्ताधाऱ्यांशी सलगी करताहेत; त्यांनी लक्षात ठेवावे, सत्ताधाऱ्यांचे तळवे चाटणाऱ्यांना काडीचीही किंमत नसते; पण लोक तोंडावर बोलत नाहीत एवढेच!

४) किमान विश्वस्तांचे अध्यक्ष यांनी आपली भूमिका जाहीर करावी!

अशा अनेक गोष्टी आहेत.... त्या आता जाहीर कराव्या लागतील; हे विश्वस्तांनी ध्यानात घ्यावे!

-एक समाज बांधव आणि माजी कार्यकारणी सदस्य श्री. सुनिल जेठे

२८ एप्रिल २०२३