लेखांक १८ वा- समाज बांधवांची सभा लावून सविस्तर माहिती द्या!

लेखांक १८ वा 

सन्मा. अध्यक्ष आणि  सरचिटणीस यांना जाहीर आवाहन!

समाज बांधवांची सभा लावून सविस्तर माहिती द्या! 

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, मुंबईचे अध्यक्ष श्री. अनिल खाजणवाडकर, सरचिटणीस श्री. श्रीकृष्ण हंजनकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक कौतुक! आज खऱ्या अर्थाने आमचे आद्यसंस्थापक डॉ. शिरोडकर आणि ऋषीतुल्य एच. डी. गावकर यांच्या विचारसरणीचा विजय झाला आहे.

विजयादशमीच्या आधी विजय खेचून आणण्याचे कौशल्य अध्यक्ष श्री. अनिल खाजणवाडकर, सरचिटणीस श्री. श्रीकृष्ण हंजनकर यांनी केले आहे. हा दुसरा विजय! पहिला विजय सीबीएसईची मान्यता मिळवून प्राप्त केला. तर आज दुसरा विजय मिळविला.


आजच सरचिटणीस श्री. श्रीकृष्ण हंजनकर यांनी आम्हाला माहिती दिली ती अशी, शहर दिवाणी न्यायालय, दिंडोशी यांच्या आदेशानुसार आज दि. २ ऑक्टो २०१९ रोजी बोरिवली पोलिस ठाण्याच्या सहकार्याने क्षा. म. स. कै. ह. ध. गावकर विद्या संकुल येथील हॉलचा ताबा क्षा. म. समाज व कॅटेरर श्री. प्रकाश घोसाळकर यांना मिळवून दिला आणि `लवकरच पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संपूर्ण संस्थेचा ताबा घेण्यात येईल!' असे जाहीर आश्वासन दिले. `

समाज माझा, मी समाजाचा!' ह्या समाजहिताच्या चळवळीमार्फत आम्ही पुन्हा एकदा क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, मुंबईचे अध्यक्ष श्री. अनिल खाजणवाडकर, सरचिटणीस श्री. श्रीकृष्ण हंजनकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक कौतुक करीत आहोत आणि समाज बांधवांची सभा लावून क्षा. म. स. कै. ह. ध. गावकर विद्या संकुल, मागाठाणे संदर्भात सविस्तर माहिती देण्याचे जाहीर नम्र आवाहन करीत आहोत. कारण जे सात वर्षात झाले नाही ते अध्यक्ष श्री. अनिल खाजणवाडकर, सरचिटणीस श्री. श्रीकृष्ण हंजनकर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सफल संपन्न होत आहे. त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे, निष्ठावंत समाजबांधव म्हणून आपल्या सर्वांची आज जबाबदारी आहे. नाहीतर अजूनही बुरखे पांघरलेले पाखंडी नेते काड्या घालण्याचे समाजद्रोही उद्योग करीत आहेत. त्यांचा समाचार आम्ही यापूर्वीही घेतलेलाच आहे. वेळप्रसंगी पुन्हा त्यांना नागवं करायला वेळ लागणार नाही. अशा लोकांकडून खोटी माहिती समाजबांधवांना मिळण्यापेक्षा समाजाच्या आजच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती देणे महत्वाचे आहे; असे आमचे म्हणणे आहे. फक्त हॉलचा ताबा मिळाला, संपूर्ण इमारतीचा ताबा कधी मिळणार? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. याबाबत यापूर्वीच अनेक मुद्दयांचा उदापोह केलेला आहे. म्हणूनच अध्यक्ष महाराज त्वरित सभा लावा; ही जाहीर विनंती! अशी विनंती सर्व समाजबांधवांनी करावी; नम्र विनंती!

(क्रमश:)
-नरेंद्र राजाराम हडकर
संपादक-पाक्षिक `स्टार वृत्त'